या सर्व गोष्टी आपली भारतीय संस्कृतीचं वेगळेपण दाखवणाऱ्या आहेत। आपल्यातला कृतज्ञ भाव, एकात्मता, सामाजिक जाणिवा या सगळ्या आणि इतर अजून बरच काही या काळात लोकांनी विसरू नये म्हणून हे सगळे कार्यक्रम। घरी बसुन बसुन एक प्रकारचं नैराश्य आलेले आपल्यात सगळेच आहेत असे नाही, पण हे उपक्रम करून आपण थोडा काळ तरी या सगळ्या पासून दूर होऊ शकतो एक वेगळा विचार करू शकतो। थाळी बजाओ मध्ये मी पण सहभागी होतो, आधी वाटलं होतं की काय कोण हे सगळं करेल, पण खरच सांगतो की पहिल्यांदाच आपला पूर्ण देश एक आहे असे वाटले (याचे कारण म्हणजे मागील 2 वर्षांत चेन्नईची विचारसरणी पाहिली असल्या कारणाने मला कधीच वाटलं नव्हतं असं काही होईल ते ही इथे)।
दिवे लावणे या गोष्टीला सध्या जरी एक वेगळा अर्थ प्राप्त झाला असला तरी माझ्यासाठी त्यात अजून माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत (आपले संस्कार ज्यात मिसळलेले आहेत)। संध्याकाळ झाली की देवासमोर कमितकमी 10 मिनिटे बसून आजी आणि आईने शिकवलेले श्लोक म्हणायचे नुसते श्लोकांचे उच्चारण न करता त्याचा अर्थ समजून घेणे याला महत्व होते। हे करण्यामागे मोठ्या माणसांना मजा वाटते म्हणून नाही करायला सांगत त्या मागे पण एक मोठा विचार आहे, मी त्याला virus scanning किंवा system upgrade म्हणेन। virus scanning अर्थातच दिवसभरात ऐकेल्या वाईट गोष्टींचे, आणि system upgrade अशासाठी की पुन्हा नव्या उमेदीने नव्या जोशाने नवीन गोष्टी शिकायला बाहेर पडू यासाठी तयार होणे। हे मी जे सगळं म्हणालो ते थोड्याफार फरकाने सगळेच आईवडील मुलांना शिकवत असतात आणि basic purpose हाच असतो असे मी मानतो। आता मोदींनी जे दिवे लावायला सांगीतले ते आपल्यातला सकारात्मक विचाराची ज्योत तेवत ठवण्यासाठी आहे ज्याचे प्रतिकात्मक रूप म्हणजे हा 9 वाजताच उपक्रम, यातला मतितार्थ सगळ्यांना कळेलच असे नाही म्हणून एक काम। जे करताना नकळतपणे आपल्यातली सकारात्मकता वाढेल।
आपल्या देशात naysayers आहेत ते सगळीचकडे आहेत म्हणून हे असे virus scans आणि system upgrade गरजेचे असतात।