Tuesday, 18 February 2025

The Sabrimala ConfusionMENSTRUATION ACROSS CULTURES A Historical Perspective

The Sabrimala Confusion
MENSTRUATION ACROSS CULTURES 
A Historical Perspective

Publisher: Vitasta Publishing Pvt Ltd

लेखक- Nitin Sridhar

तर आता हे पुस्तक निवडण्याचे कारण म्हणजे हे वाचून माझं अज्ञान माझ्या समोर ठिय्या देऊन बसलं। Indic Academy या संस्थेने लेखकांशी संवाद या कार्यक्रमात नितीन श्रीधर यांना बोलावले होते तेव्हा या पुस्तकाबद्दल अधिक माहिती कळली। लेखकाच्या बोलण्याने मी इतका प्रभावित झालो आणि ठरवलं हे पुस्तक वाचायचे। इतक्या कमी वयात असा विषय निवडणे याचेच मला नवल वाटले।
पुरुष असून या विषयावर लिहिणे कशाला या प्रश्नाचे उत्तर हे त्यांनीच त्यांच्या बोलण्यात सांगितले ते "की तुम्ही बायका नाही लिहीत म्हणून मला हा विषय लिहावा लागला"। आणि हे खरच आहे आपल्या anglicised बुद्धीला हा विषय झेपत नाही। 
मला देखील मी याचा फोटो टाकला तेव्हा काही लोकं म्हणाले होतो की तू कशाला हा विषय तुला काय करायचे आहे समजून घेऊन। मी वाचलं कारण मला वाटलं हा विषय मला कळला पाहिजे त्यामागचे शास्त्र हे माहिती पाहिजे। 
लेखकाने खूप अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे, कुठेही संदर्भा शिवाय नुसतीच वाक्य टाकली आहेत असे नाही। नुसता हिन्दू धर्म नाही पण बाकी पंथांमध्ये धर्मांमध्ये काय पद्धती आहेत किंवा मासिक पाळीबद्दल काय विचार मांडला आहे त्यामागची कारणे या सगळ्याची माहिती दिली आहे। 
आयुर्वेदात मासिकपाळी बद्दल कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या case study चा आधार घेऊन पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे।
Feminism च्या जगात या गोष्टी बोलणं देखील खूप मोठी संकटे ओढवून घेण्यासारखे आहे, पण hats-off नितीन श्रीधर यांनी हे कार्य पूर्ण केले। 

Conclusion: पारंपारीक पद्धती या नुसत्या पद्धती नसून एक शास्त्र आहे आणि त्याच्या बद्दल जितकी माहिती आपण मिळवू तितके आपण जागरूक होऊ। मग त्या परंपरांचे ओझे न होता तो आपल्या जिवनाचा एक भाग होतील। 

No comments:

Post a Comment

The Silence of the Influential: A Kashmiri Reckoning

In any free country, the forced exodus of a community should be a national wound not a footnote. The story of the Kashmiri Pandits is precis...