Friday, 16 May 2025

Vindication by colonial masters

 काही दिवसांपासून हा विषय डोक्यात घोळतोय याचे कारण Economic Times मध्ये आलेल्या एका बातमीने ज्याचे शीर्षक होते "Indian software engineer becomes US citizen in rare ceremony at White House hosted by Trump". खरच इतकी मोठी गोष्ट आहे का ही ज्याचे इतके कवतुक व्हावे? असं आहे का की कोणी पहिल्यांदाच भारतातून अमेरिकेत गेलं आहे आणि त्या व्यक्तीला त्येथील नागरिकत्व मिळालं आहे? तसं असतं तरी देखील मला वाटते की या गोष्टीचा कवतुक सोहळा नको करायला. एखाद्या परक्या देशाचे नागरिकत्व स्वीकारणे हेच माझ्या मते कमीपणाचे आहे, म्हणून मी आजच्या लिखाणाचे शीर्षक हे ठेवले आहे "Vindication by colonial masters". 

अमेरिकेत किंवा कुठल्याही दुसऱ्या प्रगत देशात जाण्याची, काम करण्याची, शिकण्याची महत्वाकांक्षा असणं यात मला काही गैर वाटत नाही, पण आपलं स्वत्व सोडून त्याच्याच मागे लागणं हे मला पटत नाही ("American Dream" ही नवीन गोष्ट नाही). अमेरिकेत शिक्षण घेऊन परत आलेल्या लोकांचे प्रमाण सध्या अधिक आहे, मी असे मुळीच म्हणत नाही की जे जातात ते परत येत नाहीत. पण मुद्ध हा आहे की परत आलेली व्यक्ती ही आकाशातून पडली असल्याचे भासवत, कुवत आणि संधी असून देखील स्वतःच्या देशात राहूनच त्याच्या प्रगतीसाठी खारीचा वाटा उचलणाऱ्या कित्येक लोकांना खिजवले जाते. ज्याचे कोणाचे American Dream किंवा इतर काही प्रयत्न असतील ते त्यांनी आवश्य करावे पण इथे राहणाऱ्यांनी त्यांचे कवतुक सोहळे बंद करावे.

No comments:

Post a Comment

The Silence of the Influential: A Kashmiri Reckoning

In any free country, the forced exodus of a community should be a national wound not a footnote. The story of the Kashmiri Pandits is precis...