खूप दिवसांनी काल एका ताईशी बोलणं झालं त्यात तिने विषय काढला तो हिंदुत्वाचा. विचारत होती काय चाललंय तुमच्या भारतात, ही ताई ओमानची त्यामुळे तिच्यासाठी तर हे सगळं वेगळंच आहे. हिंदू मुस्लिम राडे, लव जिहाद कायदा आणि एकूणच आपल्याकडचे सेक्युलरीझ्म. तशी ती काय कट्टर वगेरे नाही पण मुळात त्यांच्याकडे अशी विचारसरणी असतेच. माझ्या डोक्यात विचार येतो की आपण हिंदुत्व समजवायला कमी पडलो का? तर याचे उत्तर हो असेच म्हणावे लागेल. नुकतंच "Half Lion" वाचून झाले आहे त्यामुळे डोळ्यासमोर पमूलपार्थी वेन्कत नरसिम्हा राव PV (आपल्या भारताचे दहावे पंतप्रधान) आले याला कारण म्हणजे पंतप्रधान पदी असताना त्यांना "बाबरी" दिव्याला सामोरे जावे लागले तसाच प्रत्येक हिंदू कधीना कधी कोड्यात पडतो.
आपल्याला आपल्या धर्माबद्दल किती माहिती आहे? एखाद्या पर-देशातल्या व्यक्ती ने जर विचारलं हिंदू धर्म म्हणजे काय तर आपण काय सांगतो, पर-देशातला कशाला एखाद्या लहानमुलाने जरी विचारलं तरी प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने उत्तर देईल. हे स्वातंत्र्य आपल्याकडे आहे म्हणूनच आपण असे कोड्यात पडतो. PV ना ज्या दिव्यातून जावे लागले त्याचे पण कारण आपली बाजू निटपणे मांडता न येणे असेच मी समजतो. काही वेळेला समोरचा मनुष्य ऐकून नाही घेणार किंवा त्याला कळणार नाही म्हणून आपण त्या गोष्टीला खूप सिम्पलीस्टीक पद्धतीने समजवायला जातो आणि मग हनुमान म्हणजे कोण विचारलं की Monkey God सारखी उत्तरं दिली जातात.
No comments:
Post a Comment