इको लाईफ हे शीर्षक जरी असलं तरी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी विषयांतर करेन याची खात्री आहे। तर आज हा विषय कसा, त्याला कारण सध्याचे 2-3 अनुभव। नुकताच मस्कतला जाण्याचा योग आला, तिथे आमच्या बंगलोर ऑफिस चा एक जण आला होता त्याने येताना एक पाकीट चंद्रकला आणि कडबोळी आणली होती सगळ्यांसाठी खाऊ म्हणून, भारतीय रीत आहे ना रिकाम्या हाताने कुठे जाऊ नये। बिचारा तो मी सोडून कोणी त्या गोष्टींना हात देखील लावला नाही याला कारण कोणाचं डाएटिंग तर कोणाचं त्या पदार्था विषयीच अज्ञान। ह्या जागी जर त्याने चॉकोलेटच पाकीट आणलं असतं तर सगळ्यांनी ते हावरटासारख घेऊन खाल्लं असत। दुसरा अनुभव माझा स्वतःचा परत येताना चेन्नईच्या ऑफिस ला काय घेऊन जाऊ म्हणून मी वेगळं न्यायच्या हौसेने खजूर घेऊन आलो, मजा पुन्हा तिच बाकी वेळेला फुकट मिलणारी चॉकोलेटं 10 मिनिटात संपतात आणि मी नेलेला खजूर जेमतेम खपला होता। शेवटी स्वतः लोकांना देऊन संपवावा लागला। यात इकोफ्रेंडली काय प्रोसेस केलेले चॉकोलेट, की खजूर, की एका छोट्या दुकानात बनवलेले चंद्रकला नावाची मिठाई? नैसर्गिक गोष्टींना फॅन्सी नाव दिलं organic वगेरे म्हणलं की मग ते छान खपेल तो पर्यंत त्याकडे कोणी ढुंकून पण पाहणार नाही।
आपण खूप बोलतो काम शुन्य। जिथे पाहतो तिथे एका चारचाकी गाडीत एक माणूस, आता मी ही याला अपवाद नाही काही वेळा नाईलाजाने हे करावे लागते, पण रोज स्वतःच्या आरामाची सोय बघून लोक मोठमोठ्या चारचाकी गाड्या घेऊन फिरताना दिसतात। हे कधी थांबणार कुणास ठाऊक। ज्याला शक्य आहे अश्या कोणी हा बदल करायला काही हरकत आहे का, हो पण त्यात मीच का करू? हा एक मोठा प्रश्न आपल्या पुढे येणार हे नक्की। काहीजण नाईलाजाने हा बदल करतात कारण त्यांना या गर्दीत गाडी चालवणे नकोसे वाटते। आणि शेवटी सरकारने याला पर्याय द्यावा हे अगदी बाबआजमच्या काळातले वाक्य कानी पडते। माझं यावर मत हे की सरकार देखील गरजा पुरवण्यामध्ये demand supply चा रुल वापरते, तुम्ही कधी मागितली नाहीत म्हणून आम्ही दिली नाही, मेट्रो आली की किती लोकं त्याचा वापर करणार यावर ती बनवायची की नाही हे ठरते। सरकार देखील business mindset ने हे असले प्रकल्प उभे करत असते।
हल्ली लोकांना ऊन, वारा, धूळ, घाम या सगळ्या गोष्टी अनैसर्गिक वाटतात याला आपण स्वतःच जबाबदार आहोत। नवीन पिढीला पण हल्लीचे आईवडील हेच शिकवतायत। luxury हल्ली सवय बनली आहे त्यामुळे त्याची किंमत राहत नाही, तुम्ही म्हणाल आम्ही आमचे पैसे कसे आणि कशावर खर्च करायचे हे तू कशाला संगतोयस। बरोबर आहे मी इथे उपदेश मुळीच करत नाहीए, फक्त विचार करावा असे सुचवतो आहे। मौज करावी पण रोजचे आयुष्य साधे ठेवावे, जेणेकरून त्या मौजेची खरी मजा घेता येईल। AC बद्दल उदाहरण द्यायचे तर त्यात देखील आमची मतं खूप वेगळी आहेत, यात खरं कवतुक नामिताच कारण ती पूर्णवेळ घरी असते आणि तरी देखील चेन्नई सारख्या ठिकाणी 2 वर्षात एकदा सुद्धा आपण AC घेऊ असं ती म्हणलेली नाही। पण यात सुद्धा आम्हीच का? असं जर आम्ही म्हणालो तर काय बिघडणार आहे, इतके AC आहेत त्यात अजून एक। नैसर्गिक रीतीने छान थंड हवा घरात कशी आणावी यावर youtube वर कित्येक व्हिडीओ आहेत, ते आपण बघावे, नुसतं फेसबुक आणि ट्विटरवर ग्लोबल वॉर्मिंग ची चिंता दाखवून काही होणार नाहीए।
मी गेल्या 5 - 6 वर्षात बदललो आहे आधी मी देखील याच घोडदौडीतलं एक प्यादं होतो। घोडदौड म्हणायची कारण आपण सभ्य लोकांना कशी नावं ठेऊ शकतो?
मी हे लिहिलेलं किती लोक वाचतील हे माहिती नाही पण माझ मन मोकळं करण्यासाठी हे आज लिहावेसे वाटले।

No comments:
Post a Comment