Friday, 20 December 2019

भाषावाद

सध्या आपण बरेच भाषेबद्दल ऐकतोय की हिंदी भाषा हवी की नको त्या संदर्भात थोड्या महिन्यांपूर्वी एक आर्टिकल लिहिलं होतं "मिश्र भाषा" या नावाने त्याच्याबद्दल आज आठतवते आहे. त्यालाच अनुसरून आज गूगल व्हॉइस टायपिंग च्या मदतीने थोडसं लिहावा म्हणतोय.
आपल्या देशात इंग्रजांचे राज्य होते हे तर सगळ्यांना ठाऊक आहे, पण त्याच्यात मजा अशी आहे की आपण सगळे इंग्रज बनायच्या भानगडीत पडतो, प्रत्येक वेळी नाही म्हणता येणार पण बरेचदा. आता यात आपण मराठी एकटे नाही सगळेच भारतीय असेच आहेत थोड्याफार फरकाने. हा फरक आपण किती शिकलो आहोत ह्या वर अवलंबून नसून आपण आपले पूर्वज काय करायचे हे विसरलो म्हणून जास्ती आहे. आता पूर्वज म्हणालो म्हणजे माझे आजी आजोबा किंवा तुमचे आजी आजोबा तसं नाही एकूणच आपले पूर्वज हे कुठली भाषा वापरायचे याचा कोणी विचार केला आहे का? एक उदाहरण अगदी लख्खपणे माझ्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे शंकराचार्यांचे, ते स्वतः केरळचे तरीही त्यांनी भारतभर भ्रमण करून चारही दिशांना मठ स्थापन केले, त्यांना कुठे भाषेचा अडसर आला नसेल का? त्यांनी हे कुठल्या काळात केले त्यावेळेस ट्रान्सलेटर होते का मला नाही माहित. माझ्या मते त्याकाळात त्यांनी संस्कृतचा वापर केला असावा. आता कोणी म्हणेल की हा कोण उठून मला संस्कृत शिकायला भाग पाडणारा, अहो पण आपण चुकलो म्हणून आपल्या पुढच्या पिढ्यांनी पण चुकायचे, हे काय मला पटत नाही. आता याचा विचार केला की शिक्षण पद्धती बदलायची तर त्यात मला नाही वाटत कुठल्याही सरकारने काही आतापर्यंत केलं किंवा मोदी सरकार पण त्यात काही करेल. अहो पण आपण काही केले नाही तर सरकारला दोष देऊन काय उपयोग. हिंदी भाषेच्या ऐवजी संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा असेल तर जो हिंदी विरोध होतो दक्षिणेच्या राज्यांतून तो होणार नाही अथवा होईल सुद्धा, पण जो द्वेष असतो हिंदीचा तो संस्कृतच्या बाबतीत नसेल असा अंदाज लावायला हरकत नाही. डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा संस्कृत ही राष्ट्रभाषा असावी याचा आग्रह धरला होता आणि त्यांना समर्थन देणारे पण होते पण काही राजकीय कारणांमुळे ते झाले नाही.

विषय भाषेचा आलाय म्हणून मी अनुभवलेली ओमान मधली एक गोष्ट सांगतो त्यांनी त्यांची भाषा इतक्या छान प्रकारे जपली आहे आणि त्याचे मला कौतुक वाटते. त्यांनी त्यांच्या गव्हर्मेंट रिलेटेड वेबसाइट्स किंवा लीगल प्रोसिडिंग किंवा visa या सगळ्या गोष्टी अरबी मध्ये केल्या आहेत. आणि तेसुद्धा लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून. आपल्याला वाटत असेल की अरे कॉम्प्युटर आला म्हणजे इंग्लिश पाहिजे आपल्या कोणाच्या मनात हे येत नाही की आपली भाषा वापरून आपण तोच कॉम्प्युटर वापरून बऱ्याच गोष्टी करू शकतो. हे सगळं असलं तरी ओमान हा प्रगत देशांमध्ये मोडला जात नाही. त्यांच्या सगळ्या सिस्टीम सगळी प्रगती सर्व गोष्टी हे 1970 च्या नंतर सुरु झाले आपल्या स्वातंत्र्यानंतर 20 वर्षांनी तरी देखील ते हे करू शकले. त्यांनी जे केलंय ते भारतासारख्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये प्रगत असलेल्या राष्ट्राला करता नाही येणार का? मी हे नाही म्हणत की आपल्याकडे राज्यभाषा किंवा हिंदी याचा वापर होत नाही, तो होतो सरकारी कामकाजात किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पण तो ठराविक गोष्टींपुरताच असतो तसं बघायला गेलं तर प्रेफरन्स नेहमी इंग्लिश लाच. आता हेच बघा मी हे लिहितोय मराठीत पण कित्येक शब्द माझे इंग्लिश मध्ये आहेत. अजून एक मुद्दा आहे ही आपली भाषा लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला लॅटिन लेटर्स ची गरज लागते. आता मराठी टायपिंग अवघड आहे किंवा मला त्याची सवय नाही असं म्हणणाऱ्यातला मी पण आहे त्यात माझी काही वेगळी गत नाही, पण हा विचार करणं गरजेचं झालं आहे. डॉक्टरस अस म्हणतात की एखादा अवयव वापरला नाही तर तो कालांतराने निकामी होतो तसेच आपल्या भाषेबद्दल झाले तर?

तमिळनाडूमध्ये आल्यापासून तमिळ लोकांबद्दल एक जो गैरसमज होता की ते तमीळ शिवाय काही दुसरे बोलतच नाहीत तसं काही आत्तापर्यंत तरी अनुभवास आलं नाही. याचे कारण इंग्रजीचा प्रभाव हा तमिळनाडूमध्ये पण इतका वाढला आहे की सगळेच इथे इंग्रजी बोलतात. तरीदेखील मला त्यांच्याशी बोलायला एखाद्या विदेशी भाषेचा आधार घ्यावा लागतोय याचे वाईट वाटते. आणि मग लक्षात येते की आपण किती एकमेकांपासून लांब आहोत. आपण म्हणतो की विविधता मे एकता वगैरे वगैरे पण नुसती भाषा हीच जर आपल्याला एवढं लांब करत असेल तर कसली विविधता आणि कसलं काय. मोदी एकदा म्हणाले होते की उत्तरेच्या राज्यातल्या एखाद्याने तमिळ भाषा शिकावी आणि तमिळ मधल्या एखाद्याने मणिपूर ची भाषा शिकावी हे सगळं बोलायला ठीक आहे पण ते आचरणात आणायला तसे सोपे आहे का आणि त्याच्यासाठी कोणी तयार आहे का. आम्हाला येथे एक वर्ष झालं तरीही मला दोन तीन शब्द सोडले तर त्यापलीकडे काहीही कळत नाही याला जसा मी जबाबदार आहे तसंच मी म्हणेन आपला सगळ्यांचाच colonized mindset जबाबदार आहे, आणि जो बदलायची गरज आहे.

No comments:

Post a Comment

The Miss Fit

Today I am again stuck in the memory lane not sure why but then, getting the flashback of all the experiences which somehow made me realize ...