खूप वाटतं शुद्ध भाषा वापरावी पण खरंच ते शक्य आहे?
माझं स्वतःच म्हणाल तर नुसता विचार देखील अवघड आहे। या वरच्या वाक्यातच "वापरावी" या ऐवजी "use" कराव असच चटकन आलं होतं डोक्यात। पण काय ना आता भाषेबद्दल लिहितोय ते ही मराठी आणि मी तसा चुकून या ऐंशीच्या दशकात जन्माला आलोय मी कसा असा चुकू शकतो, म्हणुन विचार करून वापरावी हे use केले।
आता येतो मूळ मुद्द्यावर। खूप दिवस झाले मनात होत कुठेतरी लिहावं या विषयी पण खरं सांगू तर मी या भानगडीत पडत नाही, पण आज लिहितोय मिश्र-भाषा या विषयावर साध्या मराठीत म्हणायाच तर mixed language बद्दल। आपण आपल्या मनात विचार करत असाल काय बोर करतोय हा, पण वाचकांनी हे लक्षात घ्या की "bore” हे सुद्धा एक मिश्र भाषेचे उदाहरण आहे। मी थोडासा भाषेला आपल्या सध्याच्या परिस्थितिशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे। मिश्र भाषा खरच आपल्याला सोपी वाटते म्हणून वापरली जाते की सध्याच्या नव्या युगाचा एक बदल म्हणून आपण तिला (मिश्र भाषेला) आपलेसे केले आहे? माझ्यासारख्या असंख्य english medium मध्ये शिकलेल्यांना हे लक्षात पण येत नाही की ते कधी मधून मराठी मध्ये बोलतांना इंग्लिश घुसवतात। खरी कमाल आहे ही आमच्या आजी आजोबांची की जे ही अशी मिश्र भाषा समजून घ्यायला नवे शब्द शिकतात आणि नातवंडांना आपलंसं वाटावं म्हणून तेही तशी मिश्र भाषा वापरतात। आता यात मी तक्रार नाही करत पण नुसतं एक observation (निरीक्षण)।
सुदैवाने मी वेगवेगळ्या प्रकरारच्या चालीरितींचा खूप जवळून अभ्यास करू शकलो, करण मला तसे सगळ्या प्रकारचे लोकं भेटत गेले त्यातून माझा निष्कर्ष हाच की सगळीकडे हे असच आहे, यात मराठीच नाही तर अरबी, तामिळ, हिंदी, तेलगू, गुजराती, मल्याळम, सिंधी, मारवाडी, पंजाबी सगळ्या मिश्र भाषा झाल्या आहेत।
एक बाजू याची अशी की यात आपण मिश्रण जे बघतो ते इंग्रजी आणि बाकी भाषा असच दिसून येतं। याचे प्रमुख कारण हेच की इंग्रजी ही world language बनली आहे। अहो मग कोणी म्हणेल की world शी बोलताना वापरा तुमची world language पण आपल्या गावात किंवा आपल्या राज्यात तरी शुद्ध भाषा असावी। आता हे थोडंस मनसे च्या दिशेने चाललंय काय बरोबर ना? पण अहो तो (तो म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आलच असेल मी कोणाबद्दल बोलतोय) जे बोलतो ते थोडं वेगळं आहे कसं ते सांगतो। उदाहरणार्थ घ्या संस्कृत भाषा, खूप लोकांच्या पोटात गोळा आला असणार आता हा संस्कृत बोलायला सांगतोय की काय, ते काही जमायचं नाही हा दहाव्वीच्या परीक्षेत छान गुण मिळावे म्हणून काय ते संस्कृत प्रेम आमचं, आम्हाला नको आता त्या भानगडीत पाडूस। असं म्हणणारा मी पण होतो काही वर्षांपूर्वी पण आता एक प्रयत्न करतो की कुठलाही नवीन संस्कृत श्लोक शिकला की त्याचा अर्थ शोधायचा, ते थोडेच आहे आणि त्याचा संस्कृत भाषेला काही फायदा नाही। कारण अर्थ मी शोधतो तो इंग्रजी किंवा फार तर मराठीत। थोडं विषयांतर झालं, पण माझं म्हणणं हे की संस्कृतची जी आज स्थिती आहे ती थोड्या वर्षात मराठी आणि बाकी मिश्र भाषा झालेल्या सगळ्यांची होणार आहे। त्यासाठी जे बेफिकीर आहेत ते जसे परदेशात जाऊन बसलेले आहेत तसे ते इथेही आहेत। म्हणून नुसता NRI ना दोष देत नाही मी पण, नेहमीप्रमाणे अपेक्षा पाहिले इथे असलेल्या लोकांकडून अधिक करतो।
काही गोष्टी ज्या मला वाटतं प्रयत्न करण्यासारख्या आहेत,
1. मिश्रण करायच आहे, ना तर ते भारतीय भाषांचे करा इंग्रजी टाळा हे का म्हणतो मी की आपल्याला एकमेकांच्या भाषांचे काही शब्द आपोआपच कळतील की जे देशाच्या ऐक्यासाठी कामास येतील।
2. आजी आजोबांना आपले नवीन इंग्रजी शब्द शिकवतांना त्यांच्याकडून नवीन मराठी शब्द शिका, ते आनंदाने नक्कीच अपल्याला आपला शब्दसंग्रह (vocabulary) वाढवायला मदत करतील।
3. Google ने खूप चांगली सोय केली आहे देवनागरीत लिहिण्यासाठी त्याचा फायदा करून घ्या।
4. आपल्या पुढच्या पिढीला मराठी साहित्याची गोडी कशी निर्माण करता येईल याचा प्रयत्न करा। कारण आपण वाचलं असेल Harry Potter पण त्यात आपण खूप श्रेष्ट व्यक्तींना आणि त्यांच्या साहित्याला मुकलो, जे आता आपल्याला फिल्मच्या माध्यमातून कळणार आहे (जसेकी वीर सावरकर, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर....)
5. खूप महत्त्वाचं म्हणजे अभिमानाने आपली भाषा वापरा, कमीपणा त्यागोष्टींचा असावा ज्यात काही दोष असतात, माझ्यामते दोष असतील तर ते भाषा वापरणार्यामध्ये असतील भाषेत नाही।
No comments:
Post a Comment